होय CCC कोर्स करणे MS-CIT प्रमाणेच बंधनकारक ! | APJ Computer
संगणक अर्हता परीक्षेबाबत
महाराष्ट्र शासन
माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग शासन निर्णय क्रमांक: मातंस २०१२/ प्र. क्र. २७७/३९
मंत्रालय, मुंबई - - ४०००३२. दिनांक : ०४ फेब्रुवारी, २०१३
वाचा :- APJ Computer
१) शासन अधिसूचना क्रमांकः सेप्रनि/१०९८/प्र.क्र.७/९८/१२ दि. २५/०१/१९९९
२) शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांकः प्रशिक्षण २०००/ प्र. क्र. ६१ / २००१/३९
दिनांक ०७/०८/२००१ ३) शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांकः प्रशिक्षण २०००/ प्र. क्र. ६१/२००१/३९
दिनाक १९/०३/२००३
४) शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांकः मातंसं / नस्ती-०४/२२४/३९ दिनांक
२६/०५/२००४
५) शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांकः मातंसं/नस्ती-०७/प्र. क्र.७१/३९ दिनांक २१/०२/२००८
६) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, परिपत्रक क्र. रा.मं./पापुई/संगणक अभ्यासक्रम / ७४१६ दि. १२/१२/२०११
प्रस्तावना :- APJ Computer
शासनाच्या दैनंदिन कामकाजात संगणकाचा तसेच माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्या अनुषंगाने क्र. २ वरील अधिसूचने अन्वये गट अ व क मधील सेवकांना संगणक हाताळण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्या दृष्टीकोनातून शासकीय सेवकांनी संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत. कोणते संगणक अर्हता प्रमाणपत्र शासकीय सेवकांनी सादर करावे याबाबत वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे. संगणक हाताळणीचे ज्ञान अनिवार्य करण्याची अधिसूचना निर्गमित झाल्यानंतर संगणक व माहिती तंत्रज्ञान या विपयात फार मोठी प्रगती झालेली आहे. त्या अनुषंगाने या विपयाचे महत्व ओळखून शासनाने संगणक आणि माहिती तंत्रज्ञान विपयाचे अभ्यासक्रम शालेय /
शासन निर्णय क्रमांकः मातंस २०१२/ प्र. क्र. २७७/३९ | APJ Computer
महाविद्यालयीन शिक्षणात समाविष्ट केलेले आहेत. या पार्श्वभूमीवर यापुढे शासकीय सेवेत येणारे उमेदवार हे शालांत परिक्षेत संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषय घेऊन उत्तीर्ण झालेले असतील ही बाब विचारात घेता यापूर्वीचे संगणक अर्हता परिक्षेवावतचे क्र. २,४ व ५ वरील शासन निर्णय अधिक्रमित करुन शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.
![]() |
| होय CCC कोर्स करणे MS-CIT प्रमाणेच बंधनकारक ! |
शासन निर्णय:- | APJ Computer
शासन निर्णय क्रमांकः मातंस २०१२/ प्र. क्र. २७७/३९ | APJ Computer
महाविद्यालयीन शिक्षणात समाविष्ट केलेले आहेत. या पार्श्वभूमीवर यापुढे शासकीय सेवेत येणारे उमेदवार हे शालांत परिक्षेत संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषय घेऊन उत्तीर्ण झालेले असतील ही बाब विचारात घेता यापूर्वीचे संगणक अर्हता परिक्षेवावतचे क्र. २,४ व ५ वरील शासन निर्णय अधिक्रमित करुन शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.
शासन निर्णय:- | APJ Computer
राज्य शासनाच्या गट अ, ब आणि क मधील कर्मचाऱ्यांना या संगणकीय अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र धारण करणे अनिवार्य आहे. तथापि, खाली नमुद केलेल्या संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परिक्षा उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना संगणक अर्हता परिक्षा उत्तीर्ण असल्याचे समजण्यात येईल.१) D.O.E.A.C.C./NE.I.LI.T. नवी दिल्ली चे CCC प्रमाणपत्रधारक.
२) राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमाच्या इयत्ता ९ वी व इयत्ता १० वी साठी माहिती तंत्रज्ञान विषय अभ्यासणाऱ्या विद्यार्थ्यांना व इयत्ता ११ वी व इयत्ता १२ वी साठी माहिती तंत्रज्ञान, संगणक शास्त्र, कॉम्प्युटर टेक्निक व मल्टीमिडीया अँड इंटरनेट टेक्नॉलॉजी हे विषय अभ्यासून उत्तीर्ण.
३) केंद्रीय माध्यमिक शालेय शिक्षण मंडळाची इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी ची परीक्षा संगणक / माहिती तंत्रज्ञान हे विषय घेऊन उत्तीर्ण.
४) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या संगणक तंत्रशास्त्र (Computer Technology)/ संगणक अभियांत्रिकी (Computer Engineering) / माहिती तंत्रज्ञान (Information Technology) या विपयाचा राज्य तंत्रशिक्षण मंडळाचा पदवी / पदवीका व संगणक उपाययोजन (Computer Application), संगणक उपाययोजन पद्धती व पृथक्करण (ADCSSAA) या पदव्युत्तर प्रगत पदविका (Advance Diploma), सर्व शासन मान्य विद्यापीठातील संगणक तंत्रशास्त्र (Computer Technology) / संगणक अभियांत्रिकी (Computer Engineering) / माहिती तंत्रज्ञान (Information Technology) या विपयाचा राज्य तंत्रशिक्षण मंडळाचा पदवी / पदवीका व संगणक उपाययोजन (Computer Application), संगणक उपाययोजन पद्धती व पृथक्करण (ADCSSAA) या पदव्युत्तर प्रगत पदविका (Advance Diploma) उत्तीर्ण केलेले उमेदवारांना संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण.
(५) व्यवसाय शिक्षण परिक्षा मंडळामार्फत चालविण्यात येणारे, परिशिष्ट - अ मध्ये नमूद केलेले संगणक विपयी ८६ अभ्यासक्रमांचे प्रमाणपत्र पत्रधारक.


